'अटकेपार' या साहित्यविषयक विशेष स्मरणिकेच्या प्रकाशनानिमित्त मी महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे (शाहूपुरी शाखा सातारा) आणि मावळा फाउंडेशन सातारा यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.
सातारा ही मराठ्यांच्या पराक्रमाची आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची भूमी आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या राजधानीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ९९ वे अधिवेशन आयोजित होत आहे, ही अत्यंत अभिमानाची आणि ऐतिहासिक बाब आहे. प्रसिद्ध साहित्यिक मा. विश्वास पाटील या संमेलनाचे अध्यक्ष आहेत, ही गोष्ट ही या अधिवेशनाच्या वैभवात भर घालणारी आहे.
'अटकेपार' ही स्मरणिका मराठी साहित्य, संस्कृती आणि परंपरेचा वैभवशाली वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करेल, असा मला विश्वास आहे. मराठी भाषेच्या जतन विकासासाठी आणि साहित्यातून समाजजागृतीसाठी सातत्याने कार्य करणाऱ्या सर्व साहित्यिक, लेखक आणि आयोजकांना माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा.
मराठी भाषा ही आपल्या अस्मितेचा श्वास आहे. या भाषेच्या उन्नतीसाठी आणि साहित्य संवर्धनासाठी महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग हा विविध उपक्रम, योजनांच्या माध्यमातून सातत्यानं प्रयत्नशील आहेच.
'अटकेपार' स्मरणिकेला आणि या ऐतिहासिक संमेलनाला माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा !
जय महाराष्ट्र !
सामाजिक माध्यमे