१ जानेवारी ते ४ जानेवारी २०२६
१ जानेवारी ते ४ जानेवारी २०२६
(१) १ जानेवारी २०२६ रोजी दुपारी २.०० वा. पासून ते ५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत
प्रतिनिधीसाठी निवास व्यवस्था करण्यात येईल.
(२) प्रतिनिधीसाठी एका रूम मध्ये शेअरिंग पद्धतीने किमान तीन जणांची व्यवस्था असेल व त्यासाठी
रु.६०००/- +रु.१०८०/-(१८% जी.एस.टी.) असे एकूण रु.७०८०/- एवढे शुल्क भरणे आवश्यक आहे.
(३) कॉमन हॉल मध्ये राहण्याच्या सोयीसाठी प्रतिनिधी शुल्क प्रत्येकी रु.४५००+ रु.८१०/-(१८%
जी.एस.टी.) असे एकूण रु ५३१०/- एवढे शुल्क आकारले जाईल.
(४) निवास व्यवस्था शुल्क मध्येच निवासी प्रतिनिधींसाठी १ जानेवारी २०२६ रोजीचे रात्रीचे जेवण व
दि.२ जानेवारी ते ४ जानेवारी २०२६ या तीन दिवसांसाठी दुपार व रात्रीचे जेवण अशी एकूण ७ वेळेस
जेवणाची
व्यवस्था संमेलन स्थळी करण्यात येईल. तसेच संमेलन स्थळी दि.२ जानेवारी २०२६ ते ४ जानेवारी २०२६ या
तीन दिवसांसाठी रोज सकाळी चहा- नाष्ट्याची व्यवस्था करण्यात येईल. जेवण व नाष्ट्याची वेळ
आयोजकांमार्फत कळविण्यात येईल.
(५) अनिवासी प्रतिनिधींसाठी १ जानेवारी २०२६ रोजीचे रात्रीचे जेवण व दि.२ जानेवारी ते ४ जानेवारी
२०२६ या तीन दिवसांसाठी दुपार व रात्रीचे जेवण अशी एकूण ७ वेळेस जेवणाची व्यवस्था संमेलन स्थळी
करण्यात येईल. तसेच संमेलन स्थळी दि.२ जानेवारी २०२६ ते ४ जानेवारी २०२६ या तीन दिवसांसाठी रोज
सकाळी चहा-नाष्ट्याची व्यवस्था करण्यात येईल. या करीता अनिवासी नोंदणी करणाऱ्या प्रतिनिधींनी
रु.२०००/-+३६०/-(१८% जी.एस.टी.) असे एकूण रु.२३६०/- एवढे शुल्क उपरोक्त क्र.५ मध्ये नमूद केलेल्या
बँक खात्यामध्ये भरणे आवश्यक राहील. जेवण व नाष्ट्याची वेळ आयोजकांमार्फत कळविण्यात येईल.
(६) जेवण / नाष्ट्याची कुपन्स आयोजकांकडून प्रतिनिधीना दिली जातील.
(७) एका अर्जावर एकाच व्यक्तीची नोंदणी केली जाईल
(८) प्रतिनिधीच्या मौल्यवान वस्तू, दागिने, पैसे इत्यादीची जबाबदारी त्यांच्यावरच राहील.
(९) निवास व्यवस्थेमध्ये नोंदणीकृत प्रतिनिधी व्यतिरिक्त इतर कोणालाही राहता येणार नाही.
(१०) प्रतिनिधी नोंदणी दि ०४/११/२०२५ ते ते दि. १०/१२/२०२५ याच कालावधीमध्ये करता येईल. प्रथम
येणाऱ्यास प्रथम प्राधान्य, यानुसार प्रतिनिधींसाठी आयोजकांनी आरक्षित केलेली निवास व्यवस्था उपलब्ध
राहील.
(११) निवासाच्या ठिकाणी प्रतिनिधींना चहा, नाष्टा, जेवणाची व्यवस्था असणार नाही. अशी किंवा इतर
कोणतीही व्यवस्था स्वः खर्चाने करावी लागेल.
धन्यवाद..
नंदकुमार सावंत
कोषाध्यक्ष
९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, सातारा - २०२६
संपर्कासाठी:-
(१) श्री महेंद्र पुराणिक ७६६६५८७२८८
(२) श्री संजय काटकर ७६२०६६४१७१
(३) श्री उमेश साठे ९४२३३५३८२०
(४) श्री आकाश शेटे ७०८३१२३०९७