Logo

महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा - शाहूपुरी, सातारा आणि

मावळा फौंडेशन, सातारा आयोजित

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे,


९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, सातारा - २०२६

Logo

महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा - शाहूपुरी, सातारा आणि

मावळा फौंडेशन, सातारा आयोजित

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे


९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, सातारा - २०२६


शुभेच्छा संदेश


Rajiv Barve
सचिन प्रभूणे

99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अतिशय यशस्वी आयोजनाब‌द्दल आपले विशेष आभार तब्बल दहा ते बारा वर्षाच्या आपल्या प्रयत्नांना यश आलं आणि हे 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा मध्ये आयोजित होण्याचे ठरलं, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शाहपुरी आणि मावळा फाउंडेशन है दीपं अधीत आपल्या नेतृत्वाखाली या संमेलनाचे यजमान होते

संमेलन साताराला मिळाल्यानंतर आपली चाललेली धावपळ चाललेले प्रयत्न हे सर्व जात आहेत प्रत्यक्ष संमेलनाचे थार दिवस मात्र इतिहासात कायम लक्षात राहतील आणि हे संमेलन संपूर्ण महाराष्ट्राला कायम लक्षात राहील अशा पद्धतीचं आपले आयोजन होत

या संपूर्ण संमेलनाच्या आयोजनाचे केंद्रबिंदू विनोद कुलकर्णी आपण स्वतः होता आपल्या मार्गदर्शनाखाली नंदकुमार सावंत जी देखील प्रचंड झटत होते. साहित्यिकांच्या रसिकांच्या स्मरणात राहील असे संमेलन आयोजित करण्याच्या आपल्या प्रयत्नांना यश मिळालं असं म्हणावं लागेल

साताव्याला साताऱ्याच्या साहित्य विश्वाला या संमेलनानं मोठी ऊर्जा मिळवून दिली अनेक संमेलन वेगवेगळ्या कारणांनी माजतात मात्र विनोद जी हे संमेलन नक्की गाजेल ते आपल्या आयोजनाने, त्यातील अभिनय अशा अनेक कल्पनांमुळे, मग संमेलन चार दिवसांचं करणे असो, अखंड चालू असलेला कवी क‌ट्टा असो, गझलची एक वेगळीच मैफल असो विविध कार्यक्रमाचे सूक्संचालन साताऱ्यातील व्यक्तीकडून करून घेणे असो, सातारच्या जेष्ठ साहित्यिकांचा सत्कार असो वा वेगवेगळ्या परिसंवादाला झालेली उच्चांकी गर्दी असो, सगळीकडे नेटकेपणा होता, अगत्य होते आयोजनात कुठेही कमतरता नव्हती आणि सर्व कार्यक्रमांना रसिकांनी भरभरून दाद दिली, मनापासून सगळ्या कार्यक्रमांचा आनंद लुटला

सर्व परिसंवाद गर्दीने जसं फुलले होते तसंच आणखीन एक वेगळे निरीक्षण म्हणजे बहुतांश कार्यक्रम है अगदी वेळेवर सुरू झाले संपूर्ण संमेलन स्थळ हे अत्यंत स्वच्छ नीटनेटकं ठेवलेलं होतं. बहुतांश सर्वच ठिकाणी स्वच्छतागृहांची मुबलक उपलब्धता होती सर्व स्वच्छतागृह कायमच स्वच्छ असतील याची खबरदारी आयोजकांनी घेतली होती आकाशवाणीच्या माध्यमातून चारही दिवस आम्हाला या कार्यक्रमाचे ध्वनिमुद्रण करून ते संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवताना आपल्याकडून आणि आपल्या सर्व सहकार्याकडून संपूर्ण मदत लाभल्यामुळे हे सर्व कार्यक्रम अत्यंत सुस्पष्टपणे सर्व महाराष्ट्रभर पोहोचवले गेले

आकाशवाणीला मिळालेल्या आपल्या सहकायर्याबद्‌दल आपले आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून आभार पुन्हा एकदा अत्यंत यशस्वी असं हे संमेलन आपल्या नेतृत्वाखाली घडलं याचा मनापासून आनंद आहे आणि आपल्या सहकार्याबद्‌दल आपले मनापासून आकाशवाणी तर्फ आभार आणि धन्यवाद

सामाजिक माध्यमे