Logo

महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा - शाहूपुरी, सातारा आणि

मावळा फौंडेशन, सातारा आयोजित

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे,


९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, सातारा - २०२६

Logo

महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा - शाहूपुरी, सातारा आणि

मावळा फौंडेशन, सातारा आयोजित

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे


९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, सातारा - २०२६


शुभेच्छा संदेश


Rajiv Barve
राजीव बर्वे

८-१० महिने गाजत असलेल्या ९९व्या साहित्य संमेलनाची काल सांगता झाली. प्रथमतः अत्यंत उत्तम संमेलनाबद्दल तुझे आणि तुझ्या सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन !

प्रकाशक संघाच्या पाच, रोटरीच्या दोन साहित्य संमेलनांमुळे साहित्य संमेलन भरवायचे म्हणजे किती प्रचंड कष्ट असतात हे मी जाणतो. हे तर आमच्या संमेलनांच्या कित्येक पट मोठे. सर्व व्यवस्था चौख सांभाळायच्या, कोणालाही नाराज होऊ द्यायचे नाही आणि कार्यक्रमांचा उत्तम दर्जाही राखायचा, अशी तिहेरी कसरत असते. कोणाचा कधी मान दुखावला जाईल सांगता येत नाही! राजकीय नेत्यांना सांभाळायचे म्हणजे तर महाकठीण. पण मी पाहत होतो, तू हे सर्व लीलया सांभाळत होतास. याचा अर्थ अगोदर गृहपाठ उत्तम केलेला होता. खरोखर या संमेलनात कुठेही नावे ठेवायला जागा नव्हती. उत्तम कार्यक्रमाची मेजवानी होती, दादा मिरासदार विनोदाने म्हणायचे, 'भोजन उत्तम असले की संमेलन ८० टक्के यशस्वी होते!' येथे भोजनही उत्कृष्ट होते. चांगली विक्री झाल्याने स्टॉलधारक खुश आहेत. स्टॉलवरच्या माणसांची सर्व व्यवस्था उत्तम ठेवल्याने ती मंडळी खुश आहेत.

दोष काढून टीका करणे फार सोपे असते. परंतु, या पद्धतीने प्रचंड गर्दीचे अत्यंत यशस्वी संमेलन भरवणे हे अवघड असते. दोष दाखवणाऱ्यांना हे कष्ट माहीत नसतात किंवा ते तिकडे दुर्लक्ष करतात. आज ९९व्या संमेलनाने १०० व्या संमेलनाच्या लोकांच्या अपेक्षा आणखीन उंचावल्या आहेत. ९९ आणि १०० ही संमेलने कशी व्हायला पाहिजेत त्यातील अपेक्षा पूर्तीचे हे ९९वे संमेलन होते.

लोकांची नस ओळखणारे काही कार्यक्रम होते. त्यातील 'हास्यजत्रे'चा कार्यक्रम. काल फोक आख्यान ने तर आजपर्यंतच्या साहित्य संमेलनाच्या गर्दीचा यावेळेला उच्चांक केलेला असावा.

मधुमिताच्या बहिणीच्या अचानक दुःखद निधनाने काल मी थांबू शकलो नाही. पण पहिल्या तीन दिवसांचा सुखद आस्वाद घेता आला. तू या सगळ्या गडबडीत व्यक्तिशः लक्ष घालून आम्हा दोघांची रहावयाची उत्तम व्यवस्था केलीस याबद्दलही तुला मनःपूर्वक धन्यवाद !

पुण्याला केव्हा येत आहेस? माझ्याकडून नक्की कौतुकाचा श्रमपरिहार, किंबहुना पद आणि ज्येष्ठतेमुळे हे कौतुक करण्याची माझ्यावर जबाबदारीच आहे.
परत एकदा मनापासून अभिनंदन करून थांबतो.

सामाजिक माध्यमे