अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त 'अटकेपार' स्मरणिका प्रकाशित होत असल्याचे समजून आनंद झाला. या स्मरणिकेच्या प्रकाशनास माझ्या हार्दिक शुभेच्छा !
या संमेलनाचे 'अटकेपार हे मध्यवर्ती साहित्यिक सूत्र निश्चित करण्यात आले आहे. या संकल्पनेतून व्यक्त होणारा सामाजिक बांधिलकीचा आणि दूरदृष्टीचा विचार निश्चितच समाजात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करेल.
माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।। या संत ज्ञानेश्वरांच्या ओळी मराठी भाषेचे वैभव व्यक्त करतात. अनेक थोर लेखक, साहित्यिक यांच्या विचारांनी निर्माण झालेले साहित्य आपला अनमोल ठेवा आहे. मराठी भाषेच्या अस्तित्वासाठी आणि संवर्धनासाठी कार्य करण्याच्या उद्देशाने आपले महामंडळ स्थापन झाले आहे. या कार्यामुळे मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत सहज पोहोचण्यास नक्कीच मदत होईल. महामंडळाचे सुरु असलेले कार्य नक्कीच कौतुकास्पद आहे.
मराठी साहित्य, संस्कृतीची ओळख करुन घेण्यासाठी व यावर चर्चा करण्यासाठी हे साहित्य संमेलन एक सुवर्ण व्यासपीठ ठरेल. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही आपणा सगळ्यांसाठी अभिमानाची बाब आहे. मराठी भाषेसाठी आगामी काळात जे जे करण्यासारखे असेल ते प्रामुख्याने आणि प्राथमिकतेने केले जाईल.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुढील वाटचालीस व साहित्य संमेलनास माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा !
सामाजिक माध्यमे