Logo

महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा - शाहूपुरी, सातारा आणि

मावळा फौंडेशन, सातारा आयोजित

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे,


९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, सातारा - २०२६

Logo

महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा - शाहूपुरी, सातारा आणि

मावळा फौंडेशन, सातारा आयोजित

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे


९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, सातारा - २०२६


शुभेच्छा संदेश


स्वागताध्यक्ष
श्री. देवेन्द्रजी फडणवीस,
मुख्यमंत्री, महाराष्ट्र

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणजे अभिजात मराठीचा अक्षर सोहळा. मराठी माणसाचा अभिमान असणारे हे संमेलन शतक महोत्सवाकडे वाटचाल करत आहे. यातील ९९ वे संमेलन स्वराज्याची राजधानी सातारा येथे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज थोरले यांच्या कर्तृत्व भूमीत होत आहे, याचा विशेष आनंद आहे. या संमेलनाच्या निमित्ताने 'अटकेपार' स्मरणिका प्रकाशित केली जात असल्याची बाब समाधानाची आहे.

युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापनेतून महाराष्ट्र धर्म जागृत केला. त्यातून भाषिक आणि सांस्कृतिक गुलामगिरी मोडून काढली. त्यासाठी मराठीतील परकीय शब्दांना पर्यायी शब्द शोधण्यासाठी स्वतंत्र भाषा विभाग सुरू केला. पुढे आपल्या संत साहित्याने मराठी भाषा प्रवाहित ठेवली. अभंग, ओव्यांनी मराठी रोजच्या जगण्याशी जोडली. अशा मराठी भाषेचा हा अक्षर सोहळा गेली कित्येक वर्षे सातत्यपूर्णरित्या, चोखंदळ वाचकांच्या पाठिंब्यावर वर्षानुवर्षे सुरू राहिला आहे. यात अभिजात मराठी भाषेला ज्ञान आणि रंजनाची भाषा करण्याचे मोठे कार्य आपल्या कवि-लेखकांनी साहित्यकृर्तीच्या माध्यमातून केले आहे. मराठीत अनेक साहित्य चळवळीचा उगम झाला. त्या पुढे प्रवाहित झाल्या. या प्रवाहांच्या काठावर अनेक कलाकृती निर्माण झाल्या. अंतिमतः मराठी या एकाच सरितेच्या या उपनद्या असून त्यातून मराठी माणूस समृद्ध झाला.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात न्या. महादेव गोविंद रानडे यांच्यासारख्या द्रष्ट्या समाजसुधारकाच्या पुढाकारातून सुरू झालेली अक्षर चळवळ आता शतक महोत्सवाच्या उंबरठ्यावर पोहचली आहे. या दरम्यानच्या वाटचालीत कृष्णशास्त्री राजवाडे, हरिनारायण आपटे, न.चि. केळकर, माधव श्रीहरी अणे, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर, महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार, वि. स. खांडेकर, आचार्य प्र. के. अत्रे यांच्यापासून पु. ल. देशपांडे, वसंत आबाजी डहाके, जयंत नारळीकर, रवींद्र शोभणे, प्रा. डॉ. तारा भवाळकर ते ९९ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील या सर्वांनीच मराठी भाषेचे दालन समृद्ध केले आहे.

शिवछत्रपतींच्या मराठा साम्राज्याने छत्रपती शाहू महाराज थोरले यांच्या नेतृत्वाखाली अटकेपार झेंडा रोवला. त्यावेळी मराठा साम्राज्याची राजधानी साताराच होती. त्यामुळे या स्मरणिकेचे अटकेपार नावही समर्पक आहे. आता आपल्या संमेलनांनी देखील मराठीचा लौकिक सातासमुद्रापार पोहचविला आहे. त्यादृष्टीने ही स्मरणिका साहित्यिक ठेवा ठरेल, या विश्वासासह स्मरणिकेच्या प्रकाशनास मनःपूर्वक शुभेच्छा! स्मरणिकेच्या निर्मितीत योगदान देणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा, सातारा आणि मावळा फाउंडेशन अभिनंदन!

सामाजिक माध्यमे